आई
आई

1 min

36
आई,
या शब्दातून मायेची ऊब येते
उडण्यास,
नवे बळ पिलास आई देते..!
आई म्हणजे कुणाकडेही न मागता
मिळालेलं आहे दान..!
आई सर्वात मोठा कलाकार
या रंगभूमीवरचा..!
आई म्हणजे पदर आहे
मायेचा आयुष्यभरासाठीचा..!
सोसते जी वेदनेच्या
नऊ महिने पोटात कळा..!
आई,
अखेरच्या स्वासापर्यंतचा लढा..!
जगात निस्वार्थ
प्रेमाचा सागर म्हणजे आई..!
देवळातल्या,
देवाचं अस्तित्व म्हणजे आई..!
आई म्हणजेच
सुरुवात दिवसाची...!
चिरकाल न मिटणारी
आठवण आयुष्याची...!