आई
आई
1 min
291
तुझे सारे ऊन्हाळे गेले
माणसांच्या गर्दीत हरवून
नकोस शोधू पुन्हा त्यांना
येइल तुजला गहिवरून
वेचलेस आयुष्य सारे
रमलीस तू संसारात
कर्तृत्वाची साक्ष द्याया
सज्ज सारे अगंणात
तुझ्या पावलावर पाऊल ठेवून
जमेल का चालणे आम्हा
सोशिकतेचा तुझ्या सारखा
फुटेल का आम्हा पान्हा
आई तुझ्या कार्याची
काय सांगू मी महती
तुझ्या प्रेमाची नदी
सदैव ठेवलीस तू वाहती
