आई
आई
1 min
11.8K
सगळ्या गोष्टी बदलत जातात, आई कधीच बदलत नाही,
आईपाशी भेटणारी संसाराची गुरुकिल्ली जगात कुठेच भेटत नाही...
अनमोल सुखासाठी भटकत राहत माणसाचं मन,
आईला मारलेली घट्ट मिठी म्हणजे आयुष्याचा अविस्मरणीय क्षण ...
कधी सांगते गोडीत, कधी कडवे डोस देते,
अनुभवांचे बोल सांगुनी लढा द्यायला शिकवते..
कधी असते चंद्रासारखी शीतल आणि शांत,
आई असतो ज्ञानाचा आणि संयमाचा प्रशांत..
