आई
आई
आटे शब्दांचा सागर,
जीव मायेस तिच्या आतुर.
वाढे घासातला घास,
सजे काळजीचा साज.
धरे चुकिला ती कान,
उमगता करे माफ.
घाली पोटात सारे पाप,
नी दावे जग सारं साफ.
आयुष्याची ती पाठराखीण,
सुख दु:खाची भागीदारीण.
पाजी अमृताची धार,
असे माझ्या सुखात तीच सार.
स्वत:ला विसरून,
विरून माझ्यात जाई.
कर्तव्याच्या डोंगराखाली,
स्वत:च दबु पाही.
परीस्थितीच्या जळत्या निखार्यावर,
सहजतेने चालत राही.
कष्टाच्या घामाने माखलेली माय माझी,
नेहमी बघायचीच राहुन जाई.
जन्म द्याया मला स्वत: झाली,
मृत्युच्या जबड्याची पाहुणी.
कायम झटे माझ्यासाठी,
उभी संकटाच्या गुहेत राहुणी.
पुरवण्या हट्ट सारे माझे,
ति इच्छा स्वत:ची मारी.
माझ्या आत्म्यात असे आई,
माझी हिच संपत्ती खरी.
