आई तुझे रुप
आई तुझे रुप

1 min

12.2K
षडाक्षरी
डोळ्यापुढे नित्य
आई तुझे रुप
तुज आठवावे
मनी एकरुप (1)
कांती झळाळती
जणू कनकचि
तेज मुखावरी
साधे सोज्वळचि (2)
बालपण माझे
फुलले मायेत
हात मदतीचा
सदा जीवनात (3)
शब्द मोजकेच
सुमधुर वाणी
आता अंतरली
तव हाक कानी (4)
शांत तुझी मूर्ती
बघता फोटोत
ठोका चुके मनी
कळ अंतरात (5)
निःस्वार्थी प्रेमाची
तू मांगल्यमूर्ती
गौरवाया तुज
नसे शब्दपूर्ती (6)