आई सुखावली...
आई सुखावली...
नातं हे इश्वरी निर्मिती नव जीवनाची ,
हाडामासांचा गोळा येता आकाराला डोळ्यांचे पारणे सुखावली...
ऊब त्या मायेची पंखांखाली पिले झाकली ,
परतली घरट्याला घास पिलांमुखी देऊन सुखावली ...
ममतेचा घास पोटी चोचीत देता चोच तिच्या,
हृदय पिळून मायेची पाखर घालता पिले सुखावली...
अंतर तुझ्या माझ्यात नाही बाळा कधी ,
नाळ काळजाला काळजाची स्तनपान देता सुखावली...
आईपणांचा प्रवास कुठे नाही त्याचा अंत ,
होता जन्म लेकरांचा त्यांच्या बोबड्या बोलांने सुखावली...
दुनियेशी भिडली कधी लेकरांला पाठीशी घालून,
लाख गुन्हे तरी माफी तिची प्रार्थना लेकरांसाठी करता सुखावली ...
नातं हे इश्वरी निर्मिती नव जीवनाची ,
हाडामासांचा गोळा येता आकाराला डोळ्यांचे पारणे सुखावली...
