आई नावाचं जग
आई नावाचं जग
1 min
11.9K
तिच्या उदरात आशेचे नवे अंकुर रुजते
नाळेतून देते सत्व जीव इंच इंच पोसते.
ओझे असूनही समजते सुखाचे गर्भारपण
सोसते प्रसववेदना अति जन्म लेकरास देते
तिला प्रियच सदा असो "राधा"की पोटी "कान्हा"
रक्त रक्त आटते आणि सुटतो मायेचा पान्हा.
नसते फक्त माऊलीच ती बनते पहिला गुरू
जगण्याची धडपड आणि शिक्षण होते सुरू.
मिळे जीवनाला आकार आपलेच एक जग बनते
ते सुंदर जग म्हणजे फक्त आई असते...आई असते
