आई मला वाचव....!!!
आई मला वाचव....!!!


अंधाऱ्या खोलीशिवाय मला करमेना
आणि दुःख स्वत:चे सांगायला
तुझ्यासारखे कोणीच मिळेना
तुच गं आहे माझी स्वप्नसुंदरी
आणि आहेस स्वर्गातील परी
पण सांगतो खरेच तुला
लॉकडाऊनचा या असा परिणाम झाला
तू आहेस अजूनही तेथे
आणि मीही अडकलो इथे
येत आठवण सदा राहते
डोळे माझे नेहमी तुलाच शोधते
घरामध्ये सर्वत्र तुच दिसते
फक्त सोबत तू नसते
कोरोनाला या हरवण्यामध्ये
तू दिसते फक्त माझ्या हृदयामध्ये
चेहरा तुझा नसला समोर तरी
मी करतो प्रयत्न जगण्याचा
कारण तुझ्याविना आहे ओढ मरण्याची
दररोज ताटात असूनही जेवण स्वादीष्ट
तुझ्याविना ते ही झाले भ्रष्ट
म्हणून आहेत सर्व बेचव
शेवटी म्हणेन इतकेच
या विरहातून आई मला वाचव...