आई आणि लेक (अभंग)
आई आणि लेक (अभंग)
1 min
703
आई आणि लेक I दिसतात खास |
देतसी घरास | घरपण ॥ १ ॥
हिरवाच शालू | साडी हिरवीच |
पोलके लालच | जरीकाठ ॥ २ ॥
चंद्रकोर छान | लेकिच्या कपाळी |
ती मराठमोळी | साजलेली ॥ ३ ॥
आईचे ते हास्य | समाधान किती |
आशिर्वाद देती I सदा लेकी ॥ ४ ॥
आजची ही लेक I सासरी जाईल |
आणि उद्धारील | दोन्ही कुळ ॥ ५ ॥
