आगमन
आगमन
1 min
217
आगमन तुमचे होण्यास सर्व
पाहतात वाट आतुरतेने
सुखावले मन झालो आम्ही धन्य
कृपा करी जना गणराया
होती सारे दंग होती प्रसन्न
पालटून जाई घराचे रूप
वाटे प्रसन्न प्रसन्न तुझ्याआगमनाने
होई आनंदी आनंद हे गजमुखा
तुजला म्हणती सुखकर्ता
तूच आमचा विघ्नहर्ता
भक्त पडता संकटा
तूच धाव घेशी कृपावंता
अनाथांचा तू नाथ
मोरेश्वर तू बल्लाळ
तूच चिंतामणी माझा
साकडे घालतो श्रीगणेशा
