Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

आगगाडी ट्रेन बुलेट ट्रेन..!

आगगाडी ट्रेन बुलेट ट्रेन..!

1 min
14.9K


अतिक्रमण सर्वांच होत

तस आगगाडीच पण

रूपांतर पहाता पहाता

रेल्वेत झालं


आता रेल्वे हळू हळू

कात टाकू लागली

मेट्रो बुलेट सारखी

नाव घेऊन अवतरु लागली


दुडु दुडु चालीची

झुकझुक फुकफुक

करणारी आगगाडी

कुक कुक शिट्टी विसरून गेली


कोळसा गेला

डीझेल आलं आणि

धुराची रेघ हवेत विरता

इलेक्ट्रिसिटीन बाजी मारली


मामाचा गाव आणि धाव धाव

काही नसलं तरी असायचा पाव

प्रेमाचा लागायचा ठाव

असा मामाचा गोड गाव


आता मामा दुरावला

नात्याचा बंध ताणून तुटला

मामा गरीब गरिबीच राहिला

त्याने कधी गाव नाही सोडला


आगगाडी काय

आणि रेल्वे काय

कव्यातच अडकून पडली

जेंव्हा माझी गाठ वास्तवाशी घडली


मामा मामी आत्या काका

बाबा आई आजी आजोबा

मावशी दादा ताई माई सारं

व्हाट्सअप फेसबुक वर लुप्त झालं


हॅलो हाय जीएम जीएन

आशा नात्यानं डोकं फिरवलं

नको नको ते सारं

घरात ,डोक्यात घुसल


मागे वळून पाहताना

सौख्य समाधान शांती

मागच्या वळणावर दिसली

बुलेटची गाडी केंव्हाच सुटली


आठवण मात्र सदा

दोन दगडातल्या कपरीला होते

नाते सम्बन्ध जीने

आजवर घट्ट जपले होते


दुव्याच काम करणाऱ्या

आमच्या पिढीला धुराची रेघ सुखावते

बुलेट ट्रेनची चाहूल सुद्धा

गोड सुख स्वप्नासम खुणावते.....!!!



Rate this content
Log in