आदीशक्ती
आदीशक्ती
1 min
241
तूच दिला जन्म आम्हा, तूच जगवले.
आमच्या डोळ्या आमचे जग, तूच पाहिले.
लाख मोलाची श्रीमंती, आहे आईची दौलत.
तान्ह्या लेकराला जपण्यात, करी आयुष्याची कसरत.
भावला माया ती, बहिणीची सतत पाठी.
आई एवढाच आधार, प्रेमाची दुसरी काठी.
अर्धांगिनी झालीस तू, सोबत सरते शेवटीची.
तूझ्याच सोबत करतो आहे, संघर्ष साऱ्या कसोटीची.
नव्या युगाचा प्रारंभ नवा, जागर झाला शक्तीचा.
नवदुर्गा ही अशी अवतरली, चांगभलं आदीशक्तीचा.
