STORYMIRROR

Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

आधुनिक नारी

आधुनिक नारी

1 min
51

जपून टाक पाऊल पोरी

रावण, दुर्योधन, दु:शासनाची

दुनिया आहे सारी

रोज होतात इथे

खून, बलात्कार, मारामारी

तुला बनायचे आहे

नवयुगातील आधुनिक नारी

घ्यायची आहे तुला आशा-आकांक्षेची

पंख पसरून उंच भरारी

स्वत:चे कर स्वत:च रक्षण

त्यासाठी घे कंफू-कराटेचे शिक्षण

तुझ्यातील ज्वालामुखीची भडकू दे आग

तुझ्यातील दुर्गेला मग येईल जाग

नको सहन करू आता

कुठलाच अन्याय अत्याचार

घडू दे तुझ्याच हातून नवनवीन चमत्कार

घे आता नवयुगातील काली,

महिषासुरमर्दिनीचा अवतार

हो !सज्ज करावयास

वासनांध दैत्याचा संहार

नको घाबरून जाऊस कोणाला

सिध्द करून दाखव स्वत:ला

घे उंच भरारी, पंख पसरवून

तरच तुझ्या जीवनाला मिळेल

नवे वळण, नवा आकार

अन् आधुनिक नारीचा घडेल साक्षात्कार


Rate this content
Log in