आधी केलेचि पाहिजे
आधी केलेचि पाहिजे

1 min

11.9K
अवचित घाला आला
कोसळला विश्वावरी
अशुभाच्या जाणीवेने
मन थिजे हिमापरि (1)
देती टक्कर शर्थीने
अविरत प्रयत्नांनी
माणुसकी ओथंबली
सहृदय मनातूनी (2)
आयुष्याला सावरावे
मन खंबीर ठेवावे
अन्न,धन दान द्यावे
गरीबांचे दुवे घ्यावे (3)
संवेदनशील व्हावे
मुखी भरवावा घास
निरपेक्ष कर्मामधे
देव नित्य करी वास (4)
दिन जातील सरुनी
आशा मनी पालवते
तम सरुनी जाताच
नभी उषःप्रभा येते (5)