STORYMIRROR

Nikita Gavli

Others

3  

Nikita Gavli

Others

आधी देवकी नको का जन्मायला?

आधी देवकी नको का जन्मायला?

1 min
394

इवलिशी होते, अन् इवलिशीच राहिले,

म्हणे वाढुन तरी कुठे दिवे लावणार होते.

जागी सुंदर साऱ्या जगी, वाटलं सुरक्षित अगदी होते,

माहित नाही का? पण देवानेच बोलावणे धाडले होते.


आतुर होते झाले, करण्यास नवी सुरवात,

पाऊल ठेवण्यास पहिले, सज्ज होते मी या जगात.

घाई केली का मी? अशी शंका येते हल्ली,

कारण, तोंड या जगाचं, मला पाहूच दिलं नाही.


घेतला हिरावून, श्वास माझ्या आईचा,

सांगुन नाही, अधिकार मज जगण्याचा.

हृदय तिचे धडधडत होते, ठोक्यांचे आवाज मात्र गायब होते,

जिवंत असुनही तिच्यात, प्राण मात्र उरले नव्हते.


प्रश्न मनात अनेक आहेत, नाही उत्तर एकाचेही,

कोणी सांगेल का मला, यात चुक काय आहे माझी?

दिव्याची हाव तुम्हाला, म्हणून का अंधार माझ्या वाट्याला,

अहो, ऐकण्यास बोबडे बोल बाळकृष्णाचे,

आधी देवकी नको का जन्मायला?


Rate this content
Log in