आधार
आधार
एक ती आईच असते जी नेहमी आपला भक्कंम आधार असते ,
जेहा कुणीही आपल्या बरोबर नसतं तेव्हा ती मात्र असते आपल्या बरोबर ,
सगळ्यांच्या विरोधात आपल्या पाठीशी उभी असते ,
बाहेरची शांतता पण मनात उठलेलं वादळ हे फक्त तिलाच कसं कळतं ,
कधी मैत्रीण म्हणून तर कधी उत्तम सल्लागार म्हणून ,
कधी आनंदाचे क्षण साजरे करायला ती साथ देते .
आपलं बालपण , आपलं तारुण्य ती आपल्यात पहात असते
आणि म्हणूनच ती आपल्याला समजून घेत असते ,
आपला आळस , अल्लडपणा , निष्काळजीपणा ती चालवून घेत असते ,
आपलं गुपित ती नेहमी जीवापाड जपते ,
अलगद , हळुवारपणे आपल्याशी बोलणारी आईच असते ,
आणि तसच आपणही बोलावं हे सांगणारी पण तीच असते ,
" असं करू नये , असं वागू नये , असं बोलू नये "
ह्याचा धडा शिकवणारी ती आपली शिक्षिका असते ,
" जाऊ दे आता जे झालं ते झालं " असं म्हणून मनाला दिलासा देणारी
पण ती आपली आईच असते .
चांगल्या वागणुकीसाठी , आपल्या यशाचं मनापासून पण तरीही
हातचं राखून कौतुक करणारी ती आईच असते
आपण अजून चांगलं करावं , खूप काही करून दाखवाव म्हणून .
आईला समजणं , तिच्या भावना उलगडणे कठीण असतं
म्हणूनच तर तिला आपण समजलो नाही ,
तिची कदर केली नाही , याचा वसवसा मनाला लागून राहातो .
अशा ह्या आईला कोटी कोटी प्रणाम !
