आधार
आधार
1 min
3.1K
देईल तुला आधार मी
म्हणाला होतास तू
तरी इतक्या दूर मला
सोडून राहिलास तू
येरे येरे मिठीत घे
स्वप्न माझी कुशीत घे
आला आला राजसा
होतो मला भास का?
क्षणोक्षणी जिवाला
तुझाच रे ध्यास का?
म्हणू नको ह्या वाटेवरती
मला कुणी दिसलाचं नाही
मी तर आहे जन्मापासून
सोबतीला तूच नाही
येरे येरे धावत ये
सार्या जगाला सांगत ये
गत जन्मीची ती प्रेम कहाणी
अजून रे सरलीच नाही
तुझ्या प्रेमाशिवाय दुसरी
भूकही उरलीच नाही
येरे येरे रंगात ये
पूर्वीच्याच ढंगात ये