आबरू
आबरू
स्वातंत्र्य व बचावात्मक भावनांची, अशी काही फरफट झाली.
वय मोठ आणी बुद्धी प्रगल्भ होते, तशी भीती वाढत गेली.
बालपणी खेळताना माझ्या अंगणात, रस्त्यावर वाहनांची गर्दी.
आम्ही सीमेतच खेळायचो, आम्हाला ओलांडायची सर्दी.
वय वाढल बालिशपणा गेला, तसा अंधार खाऊ लागला.
वाटायच एकटा असलो की, उजेडच आहे किती चांगला.
यथेच्छ ज्ञानप्राप्तीने, बुद्धी पसरली होती.
शंका कुशंका मध्येच, अडकली सगळी नाती.
संशयकल्लोळ असा माजायचा, मनाच्या या गाभाऱ्यात.
भीती अलगद खात होती मला, माणसांच्या या बाजारात.
वयात आले तशी, निहाळनाऱ्या नजरांचा धसका बसलाय.
आजही सीमारेषा तश्याच आहेत, प्रश्न फक्त आबरूचा झालाय.