आभाळमाया
आभाळमाया
1 min
288
आभाळमाया तुझी सदा
देते मला उभारी
आत्मविश्वासाने घेते मी
उंच गगनभरारी
तुझी माया जगाआगळी
नसे त्याला अंत
तू सोबत असताना
मी का करावी खंत
तुझ्या मायेपोटी नको
मज सोन्याचा महाल
अतिरेक नका करू
मिळे द्वेषाचे विष जहाल
समाधानाने जगत रहा
माया मिळेल आभाळाएवढी
अपेक्षांचे ओझे झटका
शिदोरी साठवा मिळे जेवढी
