STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

आभाळागत माया

आभाळागत माया

1 min
13.9K


आभाळागत माया तुझी देवा नारायणा 

जन्म देशी, सांभाळशी तुझीच करुणा ।।


नऊ मास पोटामध्ये वागवितसे आई

आभाळागत माया पोर विसरून जाई ।।


उन्हा तान्हात राबतो रानी वनी बाप 

कष्ट त्याचे विसरण्याचे कसे होते पाप ।।


विद्या मिळविण्या साठी जावे गुरू कडे 

नित्य नेमाने ते देतात जीवनाचे धडे ।।


खडे मारताही झाडे फळे देती गोड गोड

स्वार्थासाठी करावी का सांगा त्यांची तोड ।।


माणसा माणसा कधी रे माणूस होशील 

आभाळागत माया सारी ध्यानी ठेवशील?।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन