STORYMIRROR

Nita Meshram

Others

3  

Nita Meshram

Others

आभाळा देतोस का एक दान

आभाळा देतोस का एक दान

1 min
215

आभाळा देतोस का एक दान

कर तुझीया धारांची बरसात

होऊ दे शेत हिरवंगार

माझी लहानगी रोपटी

आसुसली रे तुजसाठी

मरणाच्या वाटेवर आहेत बिचारी 

दे ना त्यांना जीवनदान 


आभाळा देतोस का एक दान

कर्ज वाढलं रे डोक्यावरचं

डोंगर झालाय आता 

घरी नाही अन्न-दाना 

अन् तुझाही लागेना पत्ता 

कसं करावं? काय करावं?

चिंतेत मन झुंझत राही

निराशेच्या विळख्यात फसत जाई


आभाळा देतोस का एक दान 

होईल रे माझं शेत हिरवंगार 

आभाळा देतोस का एक दान


Rate this content
Log in