स्त्री एक प्रेरणा।
स्त्री एक प्रेरणा।
हल्ली आरशात डोकावून बघते स्वताला।
माझ्यातील स्त्री जिवंत रहावी म्हणून।
हल्ली मनात येईल ते लिहते वहीत।
माझ्यातील स्त्री लेखिका जिवंत रहावी म्हणून।
हल्ली सुचलेले गीत गात सुटते भन्नाट।
माझ्यातील स्त्री गायिका जिवंत रहावी म्हणून।
हल्ली एखाद्या गितावर ठेकाही धरते अधा मधात,
माझ्यातील स्त्री नर्तकी जिवंत रहावी म्हणून।
हल्ली मनात साचलेले बोलून घेते कागदाशी,
माझ्यातील स्त्री कवयित्री जिवंत रहावी म्हणून।
हल्ली कल्पनेतील रेघोट्या ओढून घेते कागदावर,
माझ्यातील स्त्री चित्रकार जिवंत रहावी म्हणून।
हल्ली मी प्रत्येक अंगाने स्वताकडे बघते,
माझ्यातील स्त्री एक प्रेरणा बनून जिवंत रहावी म्हणून।
