गझल... अनलज्वाला
गझल... अनलज्वाला
जीवन माझे चिखलात किती फसून आहे
शोकाकुल ती अश्रू नयनी भरून आहे
नाही कोणी आहे माझा सखा सोबती
सारे उलटे घडले मजला कळून आहे....
या आभाळी काळसर निळे रंग दाटले
मेघांचे ही भाव वेगळे सरून आहे....
घाव मनाचे घाबरतो बघ ,येण्यासाठी
मी आताशी, त्याला पुरता, उरून आहे....
सुसाट वारा, उभा ठाकतो खेटुन माटुन
प्राणपणाने दारी माझ्या बसून आहे....
काटेरी झुडूपातूनी मी वाट काढली
त्यावाटेवर दगडी धोंडे रुसून आहे....
नव्या युगाची, नवी बासरी ,वाजवून तू
ऐक झर्याचे खळखळणे ते हसून आहे..
प्राशले कधी आतआतल्या जहर दुखाचे
स्वत:ला आज ठेवलेत जे तरून आहे...
