Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Charumati Ramdas

Others

2  

Charumati Ramdas

Others

इंण्डियन फिल्म्स 2.3

इंण्डियन फिल्म्स 2.3

3 mins
1.3K


पहिली इंडियन फिल्म, जी मी बघितली होती, ती होती फिल्म सम्राट’. आणि फिल्म बघितल्यानंतर मी लटपटत्या पायांनी, तोंड उघडं ठेवून, आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देतां आणि सारखं चुकीचं वळण घेत, घरी चाललो होतो आणि क्वार्टरमधे घुसतांच मी म्हटलं:

“तोन्, तुला माहित आहे कां, की हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण आहे?’

“अरे,” तोन्या आजीने आश्चर्याने विचारले, “हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण बरं असूं शकतो?”

थोडा वेळ शांत राहून आणि दूरवरच्या मुम्बईहून घरी येता-येता मी म्हटलं:

“बॉस.”


निश्चितंच! तो हिटलरपेक्षां कितीतरी पटींनी दुष्ट आहे, कारण त्याने कैप्टन चावलाला कित्ती वर्षं तळघरांत कैदेंत ठेवलं होतं. कैप्टन चावलांच एकटा असा माणूस होता, ज्याला सोन्याने भरलेल्या जहाज सम्राटला समुद्रांत कुठे बुडवलंय, ती जागा माहीत होती! आणि कैप्टन चावलाने त्या जहाजाला बॉसच्या हुकुमानेच बुडवलं होतं! आणि जर फिल्मचे खास हीरो राम आणि राज नसते, तर माहीत नाही आणखी किती वर्षं त्याने दुष्टपणाची कामं केली असती.

मी व्लादिकला तपशीलवार सम्राटची गोष्ट सांगतो, आणि आम्हीं लगेच ही फिल्म बघायचं ठरवतो. व्लादिकला पण फिल्म खूप आवडते, पण फक्त जेव्हां आम्हीं हॉलमधून बाहेर पडंत होतो, तेव्हां तो म्हणाला, की शेवटच्या सीनमधे बॉसला फक्त तीन गोळ्या मारल्या होत्या, वीस नाहे, जसं मी त्याला सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं की वीस होत्या!

आणि त्याच्यानंतर मी लागोपाठ एका मागे एक “तकदीर”, “जागीर”, “हुकूमत”, “शोले”, “मुझे इन्साफ़ चाहिए!” – ह्या फिल्म्स बघितल्या आणि मला आता माहितीये की तो, जो “सम्राटफिल्ममधे रामचा रोल करंत होता – तो एक्टर धर्मेंद्र आहे, “शोले”मधे तो वीरूचा रोल करंत होता, आणि तो, जो बॉस होता, - तो अमजद खान आहे, तो “शोले”मधे तसल्यांच घाणेरड्या माणसाचा रोल करंत होता, फक्त आता त्याचं नाव होतं गब्बर सिंग. मग मी “शक्ति”, “खुद्दार”, “मुकद्दर का सिकंदर”, “त्रिशूल”, और “जंजीर” बघितली आणि मी अमिताभ बच्चनच्या प्रेमातंच पडलो, जो ह्या सगळ्या फिल्म्समधे आणि, “शोले”मधे सुद्धां प्रमुख रोल करतोय, आणि सगळ्यांत त्याचं नाव विजयच आहे. जर मला कधी मुलगा झाला, तर मी त्याचं नाव विजयंच ठेवीन, अमिताभच्या प्रेमाखातर.

मग थियेटर्समधे राजकपूरची “आवारा” आणि “डिस्को डान्सर” दाखवतात. इण्डिया, दोन सिरीजचा अर्थ माझ्या साठी हा आहे, की मला जावंच लागेल, कारण, फिल्म चांगलीच असेल, आणि मी ताबडतोब दोन्हीं फिल्म्स बघण्यासाठी धावतो. “आवारा” तर मला खूपंच आवडते. पण चार वेळां “डिस्को डान्सर” बघितल्यावर (त्यांत हीरो आहे मिथुन चक्रवर्ती – हा तोच आहे, ज्याने “जागीर”मधे फ़ैक्ट्री-मालक रणधीरच्या लहान भावाचा रोल केला होता) मला चांगलंच समजलंय की मोठा झाल्यावर मी एक्टरंच होई, आणि “डिस्को डान्सर – 2” मधे काम करेन, मिथुन चक्रवर्तीबरोबर. आणि, अचानक “डिस्को डान्सर-2” येते! पण ह्या फिल्मचं नाव आहे “डान्स डान्स!” मुख्य रोल पण मिथुन चक्रवर्तीनेच केला आहे, डाइरेक्टर सुद्धां तोच बब्बर सुभाष आहे, ऑपरेटर राधू करमाकरंंच आहे, तोच म्यूज़िक डाइरेक्टर – बप्पी लहरी आहे! जेव्हां मी वर्कर्स वेमधे सव्रेमेन्निकथियेटरची घोषणा आणि हे वाक्य बघितलं: “फिल्म “डिस्को डान्सर”च्या सोवियत फैन्स साठी”, तेव्हां पाच मिनिटासाठी मी जणु आनंदाने मरूनंच गेलो! आणि न जाणे कां, हे पण आवडलं की “डिस्को डान्सर” फक्त मलाच नाही, तर सगळ्यांच सोवियत दर्शकांना आवडतो!

मग एक वेळ अशी देखील येते, जेव्हां आमच्या शहराच्या थियेटर्समधे इंडियन फिल्म्स येतंच नाहीत. मी ‘09’ ह्या नंबरवर शहराच्या सिनेमा- डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमधे फोन करून विचारतो की कोणची नवी इण्डियन फिल्म दाखवणार आहे कां. मला सांगण्यांत येतं की लवकरंच “प्यार करके देखो” नावाची फिल्म येणार आहे आणि रिसीवर ठेवून देतात. मी विचारूं सुद्धा शकलो नाही की त्या फिल्ममधे कोण-कोणचे एक्टर्स आहेत. पुन्हां फोन करतो, विचारतो, की “फिल्म प्यार करके देखो”चा हीरो कोण आहे. मला कळायला तर पाहिजे नं की कोणाला पसंत करूं आणि कोणावर विश्वास ठेवू! त्यांना खूप आश्चर्य होतं, की मला ह्या गोष्टीत उत्सुकता आहे, पण टेलिफोनवाल्या बाईने हसून म्हटलं की जेव्हां फिल्म दाखवतील तेव्हां कळेलंच, की त्यांत कोण-कोण काम करतं आहे. पण मला तिच्या बोलण्याचा टोन नाहीं आवडला. मी पुन्हां फोन करतो, आणि आवाज़ बदलून विचारतोो, की एखाद्या थियेटरमधे “डिस्को डान्सर” दाखवणार आहेत कां. मला मरगळलेल्या आवाज़ात उत्तर मिळतं की नाहीं दाखवणार.

जेव्हां सकाळी मी पुन्हां फोनवर वि, की आमच्या शहराच्या थियेटर्समधे इण्डियन फिल्म्स दाखवणार आहेत कां, तेव्हां ते लोक मला ओळखून घेतात:

“मित्रा, तू काय झोपेंतसुद्धां विचार करंत होतास, की कुठे फोन करायचा आहे?”

आता मी त्यांना फोन नाहीं करंत. चांगलं नाही वाटंत. पण, मी त्यांचा मित्र कसा काय झालो?


क्रेडीट

मूळ रशियन कादंबरी "इण्डियन फिल्म्स'....


लेखक : सिर्गेइ पिरिल्याएव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


Rate this content
Log in