STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

गजर हरीनामाचा

गजर हरीनामाचा

1 min
144

गजर करूया ,हरि च्या नामाचा,

 स्वर मृदंगाचा,यां विण्याचा ||१||


जाऊ गाणी गात,हाची रे अभंग ,

होऊनि यां दंग, भजनात ||२||


रामकृष्ण हरि, गोविंद मुरारी,

गाऊ त्यां श्रीहरी, पांडुरंगा ||३||


पंढरीच्या वाटे हरि नामावळी,

दिंडी ते चालली,वारकरी ||४||


करुनि गजर घेऊनि तुळस

जनाई ते खास,वारकरी ||५||


ज्ञाना तुकोबाच्या,संगे पांडुरंग,

गाऊनी अभंग, दंग होई ||६||


संतदास म्हणे भजनी ते भली,

दिंडीते चालली, पंढरीशी ||७||


Rate this content
Log in