माझे शिक्षक🙏
माझे शिक्षक🙏
1 min
203
आयुष्याच्या वळणावर
आम्हाला मार्ग तुम्ही दाखवला।
तुमची शिकवायची तगमग बघून
प्रत्येकजण जिद्दीने शिकला।
मेणबत्तीसारखा स्वतः जळत
प्रकाश आमच्या आयुष्यात आणला।
ज्ञानरूपी इंद्रधनुचा प्रत्येक रंग
आमच्या जीवनात भरला।
गुण ओळखून आमच्यातले
सर, तुम्ही आम्हाला दाखवला मार्ग ।
त्या मार्गावर आम्हाला सोडले
म्हणून जीवन झाले सार्थ।
धन्यवाद सर, तुमचे
आजही मला आठवते वेताची छडी।
त्या छडीनेच शिकलो आम्ही
जीवनात अचूक पाढे, बाराखडी।
