बालपणीचा वाढदिवस
बालपणीचा वाढदिवस
1 min
225
बालपणीचा वाढदिवस
असतो किती छान।
नवे कपडे, चॉकेलेट
यातच हरपते भान।
मित्र घरी बोलवायचे
वाटते खूप मजा।
हळूच विचारायच त्यांना
काय आणलं मला।
बक्षीस सारी गोळा करून
बघत बसायचं त्याच्याकडे।
केक खायचा प्रत्येकाकडून
निस्वार्थी, प्रेमळ लहान मुले।
असा वाढदिवस प्रत्येक
मित्राचा करायचा।
मजा, मस्ती करून
आनंद त्यात मानायचा।
