STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

फौजी🙏

फौजी🙏

1 min
222

नोकरीला रुजू व्हायच

जेंव्हा आल मला पत्र ।

सगळ गाव अभिमानाने

निरोप देण्यास मला झाल सज्ज।


आधी केला नमस्कार माझ्या

माता माऊलीला ।

डोळ्यात अश्रू अनावर झाले 

म्हणाली काळजी घे बाळा।


वडीला जवळ गेलो तेंव्हा

त्यांनी जवळ घेतले मला।

म्हणाले जबाबदारीचे ओझे

आता तुझ्या खांद्यावर आहे पोरा।


बहीण माझी लहान 

मला येऊन बिलगली ।

रोज मला भांडणारी

आज समजदारीने वागली।


दादा माझा मोठा 

पडलो त्याच्या मी पाया।

म्हणाला, रडतोस काय वेड्या

शूरवीर तू देशासाठी निघाला लढाया।


मित्र माझे केविलवाने बघत

निरोप घेत होते।

त्यांच्या त्या बालपणीच्या आठवणीने अश्रू अनावर झाले होते।


घराकडे मी माझ्या एकदा 

मनभरून पाहील।

माझे मलाच माहीत नव्हत आता

घराकडे कधी वळतील माझी पावल ।


Rate this content
Log in