STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
175

कोणी म्हणे शरद पौर्णिमा

कोणी म्हणे कोजागिरी।

शुभ्र चंद्रमा नभात

आज लख्ख प्रकाश संध्याकाळी।


सुख ओंजळीतले त्याच्या

वाटेल आज तो ते पहा रे ।

आज सगळे जण मिळोनि

त्याच्या सोबत रहा रे।


आज शरदाच्या चांदण्यातून

लक्ष्मी बघा अवतरते।

कोजागरती म्हणून असे ती

भूवरी फिरते।


दुध आटवोनी घालू त्यात

काजू बदाम पिस्ता।

गप्पा ,गोष्टी , गाणी म्हणून

रिकामा करू आठवणींचा कप्पा।


चंद्राची किरणे पडता

दूध होईल अमृतापरी ।

चला सगळेजण मिळून

साजरी करू कोजागिरी।


Rate this content
Log in