फक्त तुझ्या असण्याने
फक्त तुझ्या असण्याने
1 min
195
फक्त तुझ्या असण्याने
घराला घरपण असत।
निगुतीचा संसार तुझा तो
म्हणून पैशाचं मला भान असत।
फक्त तुझ्या असण्याने
मायेचा ओलावा घराला
लक्ष्मीच्या पायाचा स्पर्श दाराला
नमस्कार तुळशीच्या दिव्याला।
फक्त तुझ्या असण्याने
माझ्या फाटक्या संसाराला
काटकसरीच तू लावते ठिगळ
तरी तुझे मन समाधानी, निर्मळ।
फक्त तुझ्या असण्याने
मुलांना संस्कार,सुविचार
पाहुण्यांचा पाहुणचार आणि
माझ्या कुटुंबाला निस्वार्थी आधार
फक्त तुझ्या असण्याने
पाय ओळतात घराकडे
डोळ्यात तेल घालून वाट पाहते
लक्ष सगळे तिचे दाराकडे।
