गुरुजी
गुरुजी
तोंडावर बोट
हाताची घडी
मला आठवते सर,
तुमची वेताची छडी।
पाढे ,बाराखडी
पाठ व्हायचे भरभर।
गणिताचे सूत्र त्यावर,
होता जास्तच भर।
इंग्रजीची थोडी
वाटायची भीती।
विज्ञान विषयाची
काय सांगू ख्याती।
भूगोलात पृथ्वी गोल
इतिहास ठेवायचा लक्षात
कोणाचा जन्म व तारखा ।
काय काय लक्षात ठेवू
पेच पडायचा सारखा।
सर, तुम्हीच हा नेहमी
सोडवायचे गुंता।
कसे लक्षात ठेवता येईल
याची तुम्हाला चिंता।
लक्षात कस ठेवायच
हे तुम्ही ,आम्हाला
अस गेलात शिकवत।
शिक्षक तुमचे मानते आभार
तुमच्यामुळे पेटती राहिली
प्रत्येक घरात साक्षरतेची ज्योत।
