Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Others

3  

Shital Yadav

Others

गझल

गझल

1 min
14K


गालगागा गालगागा गालगा


फेर जन्माचा असा देतो धडे

आज चर्चा देह गेल्यावर घडे


मी कधीचा संपलो आहे तरी

आज का चिंता तुला माझी पडे


रंग आता जीवनाचे हरवले

का भिते या पावसाला तू गडे


अंतरीचे घाव आता सांगती

जीवना गेले कधीचे हे तडे


अंकुरे चोहीकडे संधी जरी

अंगणी माझ्या निराशेचे सडे


काय माझे आज बाकी या इथे

घालतो दररोज देवा साकडे


अंत होती सोसलेल्या यातना

आठवांची ठेव ही माझ्याकडे


Rate this content
Log in