Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Others

3  

Shital Yadav

Others

आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर

1 min
15.3K


आयुष्याच्या वाटेवर

तुझी साथ असताना

सुखालाही गोडी नसे

तुझ्याविना जगताना


जीवनाची वाट अशी

कधी ऊन,कधी छाया

एकमेका जीव लावू

प्रणयाचे गीत गाया


सख्या तुझ्यासवे नाते

जिवापाड आसक्तिचे

कृष्ण जसा राधा मनी

गुंतलेल्या सुभक्तिचे


अलंकार सौभाग्याचा

सुशोभित श्वास माझे

भावबंध अलवार

निरागस प्रेम तुझे


समरस झाला जीव

गोड तुझ्या संसारात

निरंतर वाढे तुझा

मानबिंदु समाजात


अंतरंगी तुझी आभा

सत्वगुण मनोहारी

आयुष्याच्या वाटेवर

तूच खरा वारकरी


Rate this content
Log in