संविधान या देशाचं
संविधान या देशाचं
संविधान या देशाचं
माझ्या भीमानं लिहलं
आम्हा सर्वांचं भाग्य हो
माझ्या भीमानं लिहलं ॥धृ ॥
जाती पातीचा
लई भेद हा झाला
कैक पिढ्यांचा
भोग नशीबी आला
एका क्षणात त्यानं हो
आम्हा माणूस केलं
आम्हा सर्वांच भाग्य हो
माझ्या भीमानं लिहलं ॥ 1॥
हे लाचार जगणंं
होती सारीच बंदी
अशी केली किमया
दिली समान संधी
दिन दुबळ्यांंना त्यानं
बघा दिल्लीत नेलं
आम्हा सर्वांचं भाग्य हो
माझ्या भीमानं लिहलं ॥2॥
माझ्या घरात भीम
पानापानात भीम
देश एक राहण्या
झिजला तो भीम
नाव देशाचं त्यानं
त्रिखंडात केलं
आम्हा सर्वांचं भाग्य हो
माझ्या भीमानं लिहलं ॥3॥
राहू एकजुटीनं
घटनेचा ठेवू मान
जीवापरी रक्षूुनी
वाढवू तिरंग्याची शान
या प्रदीपच वंदन
जगजाहीर झालं
आम्हा सर्वांचं भाग्य हो
माझ्या भीमानंग लिहलं ॥4॥
