खेळ
खेळ
क्रिकेट हा खेळ आहे
आवडता सर्वांचा।
भान हरपून बसतात सारे
खेळ हा बघतांना।
प्रत्येक खेळाडू हा
जीव ओतून खेळत असतो।
माहीत असते त्यांनाही की पूर्ण,
भारत जिंकण्याची वाट बघतो।
चौका, छक्का मारला की,
बघणारे दुरदर्शनसमोर नाचतात।
भारत जिंकत आला की,
सगळीकडे फटाके वाजतात।
लहान मुलं देखील दिवसभर
दूरदर्शनसमोर बसलेली असतात।
भारताची टीम जिंकावी म्हणून
तहान भूक हरपुन बसतात।
क्रिकेट हा फक्त खेळ नसून
जबाबदारी प्रत्येक खेळाडूवर।
जीव ओतून खेळतात सगळे
लक्ष त्यांचे असते फक्त भारताच्या विजयावर।
भारत जिंकतो तेव्हा
सगळ्यांना होतो आनंद।
गुणगान गातात खेळाडूंचे
आणि नाचतात होऊन बेधुंद।
शेवटी शेवटी कधी सामना असतो
तीन चार धावासाठी अटीतटीचा।
राष्ट्रगीत सुरु झाल्यावर सर्व खुश
वाटतो गर्व भारत माझ्या देशाचा।
