कुटुंब
कुटुंब
1 min
135
एकत्र कुटुंब म्हणजे
मायेचा ओलावा।
एकमेकांना सावरतांना
प्रेमरूपी शब्दांचा सोहळा।
आजोबा आजी असतात
घराचा आधार।
त्यांच्यामुळेच टिकून असतो
एकत्र सगळ्यांचा संसार।
लेवक, सुना, नातू, नाती
सगळे करतात त्यांचा आदर।
सगळ्याना एकमेकांच्या भावनांची
करावी लागते कदर।
कुटुंबाला एकत्र बांधून
ठेवणं काही सोपं नसत।
सासू सुनांना एकमेकींना
नेहमीच समजून घ्याव लागतं।
कुटुंब एकत्र ठेवतांना
सासू,सुना, जावा जावा घेतात समजून ।
म्हणूनच तर एवढे मोठे
कुटुंब राहत असते टिकून।
