शेतकरी
शेतकरी
1 min
183
काळ्या मातीत मी जन्मलो
होत तिच्याशी माझ घट्ट नात।
शेतातली बैल होती माझे मित्र
कष्ट केले खूप त्यांनी माझ्यासोबत।
हात राबत होते माझे
वय झाले जरी एवढे ।
पीक पाहून हिरवीगार
मना प्रसन्न वाटतसे केवढे।
घरातील सगळी मंडळी माझे
कौतुक करत होती।
म्हणे लाडाने आमचे बाबा अजून
करतात हो शेती।
नाही आळस मनात कधी
नव्हती कसली हो चिंता ।
आज दिवस ऊगवला असा
काळ्या मातीच्या कुशीत
शांत निजलो मी आता ।
