STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

ती ची शक्ती

ती ची शक्ती

1 min
117

ती एक बाळाची आई

त्याला माया ममतेने जपते।

नऊ महीने पोटात बाळाला

जिवापाड सांभाळते।


घरदार असते तिच्यावर अवलंबून

नेहमी काळजी करणारी।

सगळ्यांना समजून घेणारी

वेळप्रसंगी समजून सांगणारी।


आपलं दुःख बाजूला ठेऊन

सतत आनंदी राहणारी।

दुसऱ्यांच्या सुखात आपला

आनंद मानणारी।


उत्तम गृहिणी पतीराजाला

मुलांना खुश ठेवणारी।

हसत हसत घरातल्यासाठी 

नेहमी राबत राहणारी।


आपली घरातील माणसं

सुखी आनंदी बघणं हाच तिचा उद्देश असतो।

अशा तिच्या स्त्रीशक्तीला आमचा 

मनाचा मुजरा असतो।


Rate this content
Log in