शिक्षक
शिक्षक
सर, मातीच्या गोळ्याला
देता तुम्ही आकार।
घडा बनवता सुंदर
स्वप्न आमचे करता साकार।
पहिला शब्द बोलायला
शिकलो आई आम्ही
नंतर सर्व बाराखडीची ओळख
करून दिली तुम्ही।
संघर्ष तुमचा आम्हाला
लढायला शिकवतो।
तुमची शिकवायची तगमग पाहून
आम्ही जिद्दीने बरेच शिकतो।
तुम्ही मारलेली वेताची छडी
अजूनही आम्हाला आठवते।
तिची आठवण आली की,ती
अजूनही आमच्या जीवनाला सावरते।
लहानपणी पायरी चढली
आम्ही तुमच्या शाळेची।
बालपण जपल आमचं मायेन
अन ओळख करून दिली सरस्वतीची।
प्रत्येक विद्यार्थी घडवला तुम्ही
मेहनतीने ,देऊन ज्ञानाची शिदोरी।
तुमच्या आशिर्वादानेच गुरुजी
आयुष्यात उघडली सुखाची तिजोरी ।
