परिचारिका
परिचारिका
कोणी म्हणे सिस्टर, कोणी म्हणे
परिचारिका, कोणी म्हणे ताई।
रुग्णांची सेवा करणारी,
तू होतेस कधी कधी आई।
तू रागवतेस मायेपोटी
म्हणून रुग्ण सारं ऐकत असतो।
त्याला बर करण्यात वैद्य नंतर
तुझाच मोठा आधार असतो।
रुग्णाजवळ स्वछता ठेवतेस
दिवसभर राबत असते।
जीवनात तुला दुःख किती असू दे
तरी तू नेहमी हसतमुख असते।
इतकच नाही घराला देखील
हातभार असतो तुझा।
रुग्णांची सेवा करणं हाच
तू घेतलेला असतो वसा।
किती भयानक रुग्ण येऊ दे
जळालेला,भीतीदायक,अपघाती।
घाबरत कधीच तू नाही
सेवा करण्या तू तत्पर असती।
कोरोनाच्या महामारीत देखील
जीवावर उदार तू झाली होती।
वैद्य होते देवदूत आमच्यासाठी
तू जीव लावणारी आधार होती।
रुग्ण तपासण्या येतात वैद्य,
बोलतात दोन मिनिट ।
दिवसभर तुझ्यात हातात असत
आमच दिवसभराच्या औषध, गोळ्याचं किट ।
खरच किती खडतर अन कष्टाळू
असते तुझे जीवन।
म्हणून तुला अर्पिते मी हे
काव्यरूपी सुमन ।
