सफर
सफर
चला करुया सफर आपल्या भारत देशाची ....
उत्तरेत कश्मिर तर दक्षिणेत कन्या कुमारी....
पुर्व आणि पश्चिमेला वेढला आहे अथांग सागरानी...
प्रत्येक राज्य आहे आपल्या खास नाविन्य जपुनी
हिमाचल प्रदेशात बर्फाचे डोंगर...
पंजाब मध्ये भांगडा फेमस....
राजस्थानात मध्ये वाळवंट सफारी ..
दिल्ली आहे भारताची राजधानी....
आसामात पिकतात चहाचे मळे ....
गुजरातचे रूचकर ढोकळे ...
काशी वसते उत्तर प्रदेशात...
ताजमहाल खूणवतो आग्र्यात ...
महाराष्ट्र शिवरायांची भुमी ...
मुंबई आहे लाईफ लाईन सगळ्यांची...
गोव्यात समुद्राची भ्रमंती ..
माश्या ची खवय्येगिरी...
आंध्र प्रदेशातील चटपटीत हैदराबादी बिर्याणी ...
कर्नाटकचा मैसूर पेलेस ....
केरळचा कथकली ..
कन्याकुमारी शेवटचं स्थळ ह्या सफरीत..
