लग्नाचा वाढदिवस
लग्नाचा वाढदिवस
आज आहे आपल्या
लग्नाचा वाढदिवस।
दोन अनोळखी व्यक्तीची
अनमोल रेशीम गाठिचा प्रवास।
हळू हळू लावत गेलो
आपण आपला संसार।
विश्वासाच्या जोरावर
देत गेलो एकमेकांना आधार।
काढतो कधी उणी दुनी
एकमेकांची आपण ।
मग देतो एकमेकांना
सप्तपदीच्या फेऱ्याची आठवण।
चुकले माझे कधी तर
तू मला समजून सांग।
नवीन माणस घरातली
ओळखिची होईपर्यंत जरा थांब।
हो ग राणी एकत्र कुटुंब आमचं
स्वभाव समजायला लागेल वेळ।
घरातली सगळी प्रेमळ आहे
तुझाही त्यांच्यात बसेल ताळमेळ
नेहमी सुखात राहू
समजून घेऊ सगळ्यांना।
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
देऊ आपण दोघे एकमेकांना।
