शिक्षिका
शिक्षिका
बाई तुम्ही मला शाळेत
आईसारख जपलं।
रडले कधी मी तर मला
चिऊ काऊच्या गोष्टींनी नादी लावलं।
हळू हळू उडायच कसं
तुम्हीच मला शिकवलं।
बालपण माझ मायेने बाई,
तुम्हीच हो जपलं।
शिकवत राहीलात तुम्ही
तसं मी शिकत गेले।
कधी माझ्या डोळ्यातले अश्रू
बघून तुमचे मनही हळवे झाले।
हाती दिली ज्ञानाची मशाल
संस्कारात सत्याची ढाल।
पंखात दिले बळ उडण्याचे ,
अन सांगितलं मला तू फक्त पुढे चाल ।
रागवत होतात तुम्ही मला
कधीतरी मारत होता ।
मी चांगले शिकावे म्हणून
तुमचा जीव माझ्यासाठी तुटत होता।
अजूनही आठवते मला
शाळेतली प्रत्येक गोष्ट।
आभार मानते तुमचे बाई,
खरच ! शिकवण्यासाठी आम्हाला
किती घेतलेत तुम्ही कष्ट?
