प्रेम करते मी लेखणीवर
प्रेम करते मी लेखणीवर
1 min
170
लेखणीवर मी माझ्या
खूप प्रेम करते।
मांडण्या भावना माझ्या
हात तिचा हाती धरते।
विचार माझे मांडताना
पळवते तिला भरभर।
थांबवते कधी मी तिला
विचार करते क्षणभर।
नाते तिचे नी माझे घट्ट
गर्व आम्हाला नसावा।
तुमच्यापर्यंत पोहचतांना
हात तिचा माझ्या हाती असावा।
साथ अशीच तिने
नेहमी मला देत जावी।
एकमेकींच्या प्रेमात आम्ही
दृष्ट आम्हाला कोणाची न लागावी
