अबोल व्यसन
अबोल व्यसन
व्यसनाचा राजा या जगात कोण आहे
जो असेल त्याला नक्की काय म्हणावे
कारण यात फक्त सवयीचे गुलाम व्हावे
स्वतःसोबत कुटुंबालाही नरकात घेऊन जावे
व्यसन खरंतर सवयीचा आहे बोलका खेळ
थोडा अबोल शांत पण वाईट याचा मेळ
आपण दिला त्याला कितीही अनमोल वेळ
त्याची भूक संपत नाही अन बुद्धीची होते भेळ
खरंतर वाईट सवयच थोडी बोलकी आहे
त्याच सवयीच व्यसनात कधी रूपांतर व्हावे
या वाईट प्रीतीला आपण नक्की काय म्हणावे
आयुष्य होते खराब जणू जगाची रीत होत जावे
व्यसनापुढे आपला सगळा क्रम अबोल आहे
जणू काही आपल्या सवयी आपल आयुष्यच वाहे
थोडी किम्मत राखत वाईट व्यसन थोडं विसरावे
नाहीतर आयुष्याची होईल राख अन् धूळ खात जावे.
