ती ची शक्ती
ती ची शक्ती
ती ची शक्ती खूप अनमोल
नाही मोजता येणार कशात।
देते बाळाला जन्म सोसून कळा
ठेवत असते त्याला नेहमी सुखात
तीच असते सगळ्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभी।
संसार सांभाळणारी असते ती
कर्तव्यदक्ष गृहिणी।
सहनशील, सोशिक, काटकसरी
किती विशेषने देऊ तिला।
दुःखाचा सामना करण्याची
हिम्मत येत असते कुठून तिला।
त्यागाची असते ती मूर्ती
मन मारत नेहमी असते सुखी।
तरीही हसतमुख नेहमी आनंदी
तीच ती असते मुलांची प्रेमळ सखी।
सगळं सांभाळून घेणाऱ्या
सगळं निभावून नेणाऱ्या
अशा तिला ती च्या शक्तीला
माझा साष्टांग नमस्कार।
