आर्त साद
आर्त साद
1 min
343
आर्त साद ही भावाची बहिणीला
कधी ना मिळेल दुःख छावणीला
तुझ्या जीवनी सदा सुख नांदेल
तुझ्या पदरी सौख्य भोग बांधेल
जरी भाऊ करी तुझ्या खोड्या सदा
किती छान तरी तुझे बोल दादा
नाते ह्यांचे असते किती निस्वार्थी
प्रेम नात्यात निर्मळ त्याच अर्थी
नाते हे असे सर्वांच्या जीवनी येवो
दुःख सारे बहीण भावाचे जावो
मन आज देते तुला आर्त साद
होऊ दे तुझ्या जीवनी हर्ष नाद
