मुखवटे
मुखवटे
निष्पाप कसा हा चेहरा भावनांना शोधत आहे
कामाच्या ओझ्याखाली संतोष मागत आहे
पापण्यांच्या छत्रतळाशी डोळेही विणती जाळे
आनंदी चेहऱ्यामागे अतृप्त मुखवटा आहे
संतोषी मलमाखाली अनुभवाचा घाव आहे
नशिबाच्या चक्रामागे नियतीचा डाव आहे
कानाच्या चक्रव्युहाला वामाची हाव आहे
भुवयांच्या मध्यावरती प्रश्नांचा गाव आहे
नाकाच्या रागावरती मुखवट्याचा ताबा आहे
माथ्याच्या आठयांवरती प्राक्तनाचा धागा आहे
ओठांच्या गोडयामागे स्वार्थाचा भाव आहे
गर्विष्ठी गुप्त घराला चेहऱ्याचे नाव आहे
चेहरा असत्य बोले मुखवट्याचे ओझे झेले...