स्त्रीचे दुःख......
स्त्रीचे दुःख......
स्त्री आपले दुःख
कोणाला सांगत नाही..
ती आजारी असली तरीही
ती आपले काम कधीही सोडत नाही
स्त्री आपले दुःख मनात ठेवते
सर्व काम ती वेळेवर करते...
म्हणून स्त्रिया आपले दुःख
कोणाला सांगत नाही........
सकाळी स्त्री लवकर उठते
सर्वांसाठी लवकर आणि
वेळेवर जेवण देते
स्वतः उपाशी राहून
सर्वांचा पोट भरते
नंतर ती जेवण करते....
तिचा मनात स्वतः पेक्षा
घराची लोकांची काळजी असते
तिच्या होटावर एक हसी असते
त्या मागचे दुःख
ती कोणाला सांगत नाही...
घरातल्या लोकांची खुशी
आपली खुशी समजत असते..
स्त्रीचे रूप हे अनेक असते..
ती कोणाची आई ,असते
तर कोणाची बहीण, असते
तर कोणाची मुलगी असते,
तर कोणाची बायको असते,
त्या सर्वांचं ती आधार करते.....
स्त्री सर्वांना एक ज्योती ठेवते
या सर्वांमध्ये ती आपले दुःख
कोणाला सांगत नाही......
