शिक्षकांची छडी🙏
शिक्षकांची छडी🙏
1 min
134
लहान होते तेंव्हा सर,
तुमच्या छडीला घाबरायचे।
वाटायची भीती मग,
थरथर मी कापायचे।
छडीच्या धाकामुळे
अभ्यास व्हायचा पटकन।
हातात घेतली तुम्ही कि,
सगळे कसे आठवायचे चटकन।
पाढे,बाराखडी असायचे
सगळे तोंडपाठ।
तुमच्या त्या छडीचा
असायचा विद्यार्थ्यांना धाक।
मारत तर कधी नव्हताच तुम्ही
हातात तुमच्या असायची।
बघितली आम्ही की आम्हाला
पाठांतर आठवून ती द्यायची।
मनापासून मानते ,
शिक्षक मी तुमचे धन्यवाद।
तुमच्या छडीनेच आमचा
सुखकर करून दिला पुढचा प्रवास।
